

Akola Professor Showcases Varhadi Folk Heritage at Satara Literature Meet
sakal
-स्वप्नील शिंदे
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : साहित्य संमेलनाच्या मांडवात जिथे प्रमाण भाषेचा शब्दशृंगार सुरू असतो, तिथे अकोल्याच्या मातीतील रांगड्या वऱ्हाडी बोलीचा सुगंध साताऱ्यात दरवळत आहे. वऱ्हाडी बोलीभाषेचे अभ्यासक प्रा. रावसाहेब काळे यांनी वऱ्हाडातील लोककथा, कविता आणि म्हणींचा ठेवा पुस्तकरूपाने, ऑडिओ, व्हिडिओरूपाने संकलनाचे काम हाती घेतले आहे.