
महाबळेश्वर : येथील वेण्णा तलाव परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांवर वन विभागाने कारवाई केली; परंतु प्रशासनाकडून अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात न आल्याने महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाच्या दिवशी शुक्रवारी (ता. २ मे) तलावात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अस्लम अबू डांगे, प्रशांत आखाडे, हेमंत साळवी यांच्यासह स्टॉलधारक उपस्थित होते.