

Officials inaugurating the new alternative road project near Venna Lake in Mahabaleshwar.
sakal
महाबळेश्वर : येथील वेण्णा लेक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात वेण्णा तलावाशेजारील सांडव्याच्या बाजूने उभारण्यात येणाऱ्या कमानी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे वेण्णा लेक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.