

Screenshots from the viral video that exposed illegal hunting of the rare Bowmouth Guitarfish.
eSakal
कऱ्हाड: समुद्रातील अत्यंत दुर्मिळ बो माऊथ गिटारफिशची या माशाची शिकार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. त्या अनुशंगाने वन्यजीव विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक संशयीत साताऱ्यातील आहे. अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर) व ओंकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) असी त्यांची नावे आङे. त्या दोघांनी शेड्युल एक मधील दुर्मिळ माशाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावंर प्रसारित केला. त्याचे प्रदर्शनही केल्याने त्या दोघां विरोधात वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.