esakal | 'शर्यत' बंदीमुळे आठ वर्षात 42 लाख बैलांची कत्तल; मुख्यमंत्रीसाहेब, आतातरी शब्द पाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Jadhav

घोड्याची शर्यत चालते, मात्र बैलगाडी शर्यती घेतली, की गुन्हे नोंद केले जात आहे. शर्यतीवरील बंदीमुळे गेल्या आठ वर्षांत ४२ लाख बैलाची कत्तल झाली आहे.

'शर्यत' बंदीमुळे आठ वर्षात 42 लाख बैलांची कत्तल

sakal_logo
By
विकास जाधव

काशीळ (सातारा) : नाशिकमध्ये चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन बैलगाडी शर्यती (Bullock Cart Race) सुरू करण्याची मागणी केली होती. त्या वेळी आपले सरकार आले, की प्रयत्न करू असा शब्द त्यांनी दिला होता. तेव्हा सरकार येईपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, असा निर्धार केला होता. गेल्या चार वर्षांपासून मी अनवाणी फिरत आहे. आता ठाकरेसाहेब तुमची सत्ता येऊन दीड वर्ष झाले, तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत. बैल, गाईना अनुदान द्या व संविधान कलम ४८ प्रमाणे जुंपण्याची जनावरे कोणती ते जाहीर करा, या मागण्यासाठी ठाकरेसाहेब मी मुंबईला येत आहे, मला भेटा आणि दिलेला शब्द पाळा, अशी आर्त हाक साखराळे (जि. सांगली) येथील विजय जाधव यांनी दिली आहे. (Vijay Jadhav Demand To Chief Minister Uddhav Thackeray To Start Bullock Cart Race In Maharashtra bam92)

इस्लामपूर ते मातोश्री (मुंबई) बैलगाडीतून बैलाची प्रतिकृती घेऊन अनवाणी विजय जाधव व नितीन पाटील यांनी पदयात्रा सुरू केली आहे. या वेळी श्री. जाधव म्हणाले, ‘‘ट्रॅक्टर कंपन्यांसाठी सरकारने बैलाला जंगली प्राणी म्हणून घोषित केले. मग जुंपण्याची जनावरे कोणती ते जाहीर करा. बैल तर जुंपण्याचे जनावरे असेल तर जंगली कसा होतो. बैलाची शारीरिक क्षमता तपासा. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाची क्षमता धावण्याची असेल, तर बैलाच्या मैदानी खेळास परवानगी द्या. घोड्याची शर्यत चालते मात्र बैलगाडी शर्यती घेतली, की गुन्हे नोंद केले जात आहे. शर्यतीवरील बंदीमुळे गेल्या आठ वर्षांत ४२ लाख बैलाची कत्तल झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या बैलगाडीस बैल नसल्यामुळे मी बैलगाडी ओढत आहे.’’ मुख्यमंत्रीसाहेब मी २२ जुलैला देशी बेंदराला मुंबईला येत आहे. मला वेळ देऊन आमच्या मागण्यांबद्दल आश्‍वासन द्या आणि अनवाणी फिरणे माझे बंद करा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

हेही वाचा: 'जनरेट्यापुढं भले-भले झुकतात; ईडीनं कारवाईचं धाडस बंद करावं'

पोलिस भरती होत नसल्याने दररोज हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. यातून विद्यार्थ्यांच्यात नाराजी येत आहे. सरकारने नुसते आश्‍वासन न देता त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी नेर्ले (जि. सांगली) येथील संदीप पाटील हा तरुण या पदयात्रेत सहभागी झाला आहे. भरतीत होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्याचे होणारे नुकसान सांगण्यासाठी मी जात असल्याचे संदीप याने सांगितले.

Vijay Jadhav Demand To Chief Minister Uddhav Thackeray To Start Bullock Cart Race In Maharashtra bam92

loading image