
सातारा : मागील उत्पादन शुल्कमंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याशिवाय दारूच्या दुकानांची खैरात वाटली. आता नवीन उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मद्याची दुकाने वाढविण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का? असा सवाल करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करण्याऐवजी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम हे सरकार व त्यांचे मंत्री करत आहेत, अशी टीका राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलास जवळ यांनी केली आहे.