
मेढा : महाराष्ट्रात दारूबंदी चळवळीने व महिलांच्या यशस्वी लढ्याने नावलौकिक प्राप्त केलेला देशातील एकमेव जावळी तालुका असून, अवघ्या १० महिने २३ दिवसांत महिलांच्या मतदानाने १७ वर्षांपूर्वी संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त करण्याचा सुवर्ण इतिहास रचला गेला; पण हा इतिहास पुसण्याचे पाप उत्पादन शुल्क विभाग व पोलिस खात्याच्या आर्थिक हितसंबंध व आशीर्वादामुळेच होत असल्याने लवकरच याविरोधात आंदोलन करणार असल्याचे व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते विलासबाबा जवळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.