esakal | निवडणुकीच्या तोंडावर काका-पृथ्वीराजबाबांना मानणारा गट एकत्र; मनोमिलनाची रंगली चर्चा I Prithviraj Chavan
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party

माजी आमदार (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर व पृथ्वीराजबाबांचे नेतृत्व मानणारे कॉंग्रेसअंतर्गत दोन गट कऱ्हाडात कार्यरत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर काका-पृथ्वीराजबाबांना मानणारा गट एकत्र

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विंग (सातारा) : गावठाणाअंतर्गत रस्ता भूमिपूजनच्या येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसअंतर्गत (Congress Party) काका आणि पृथ्वीराजबाबांना मानणारे दोन गट एकत्र आले. मनोमिलनाची चर्चाही त्यानिमित्ताने रंगली. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका (Election) डोळ्यासमोर ठेऊनच सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन याप्रसंगी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या प्रयत्नातून आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांच्या फंडातून मंजूर ५४ लाख रुपये खर्चाच्या गावठाणाअंतर्गत विविध रस्ता बांधकामाचे भूमिपूजन येथे झाले. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, मलकापूर पालिकेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, इंद्रजित चव्हाण, सरपंच शुभांगीताई खबाले यांसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विजयाताई माने, पुष्पाताई महिपाल, भागवत कणसे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राऊत, दीपाली पाटील, साधना कणसे, बाबूराव खबाले, संतोष कासार-पाटील, शंकर ढोणे, अलका पवार, माजी सरपंच धनाजी पाटील, सोसायटी अध्यक्ष हिम्मत खबाले, संभाजी पाटील, निळकंठ खबाले, कॉंग्रेसअंतर्गत दोन्ही गटांचे कार्यकर्ते हजर राहिले.

हेही वाचा: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

Congress Party

Congress Party

माजी आमदार (कै.) विलासराव पाटील- उंडाळकर व पृथ्वीराजबाबांचे नेतृत्व मानणारे कॉंग्रेसअंतर्गत दोन गट येथे कार्यरत आहेत. राजकीय मतभेद विसरून येथे झालेल्या या भूमिपूजनाला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर राहिले. त्यामुळे मनोमिलनाची चर्चाही त्यानिमित्ताने रंगली. बाबांच्या प्रयत्नांतून कोट्यवधींची कामे गटात साकारली आहेत. २२ गावांत विकासासाठी निधी दिला आहे, आणखी देऊ, अशी ग्वाही यावेळी शंकरराव खबाले यांनी दिली. विकासकामे होतच राहतील. त्यासाठी एकजूट महख़्‍वाची असून, अगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन याप्रसंगी मनोहर शिंदे यांनी केले. भागवत कणसे, शिवराज मोरे, रमेश देशमुख आदींची मनोगते झाली. बाबूराव खबाले यांनी प्रास्ताविक केले. विकास होगले यांनी आभार मानले.

हेही वाचा: शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं

loading image
go to top