
सातारा : सरपंचांकडून अधिकार घेऊन गावचा कारभार बेकायदेशीरपणे चालविला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे महिला किंवा आरक्षित पदावरील सरपंचाकडून अधिकार घेऊन कारभार चालविणाऱ्या गावपुढाऱ्यांना आता चाप बसणार आहे.