
रहिमतपूर: येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वडाच्या झाडावर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय रहिमतपुरांनी घेतला. त्यानुसार येथील ज्योतिर्लिंग मंदिर (जोतिबा माळ) येथे बाधित झालेल्या ११ वर्षे जुन्या झाडाचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले. त्यामुळे या झाडाला नवसंजीवनी देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.