
कास : परळी खोऱ्यातील कुढेघर गावानजीक असलेल्या रस्त्याचा भराव वाहून गेला आहे. मात्र, या रस्त्यावरून अवजड वाहने तसेच इतर गाड्या सुरू आहेत. असे असतानाही या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. कुढेघर गावाच्या पुढे रोहोट, वेणेखोल, अलवडी, पाटेघर, नावली अशी गावे असून, या गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांना बससेवा बंद असल्याने आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.