राजकारण्यांना कामाला लावण्याचं काम 'पाणी फाउंडेशन'चं : आमदार गोरे

सत्यमेव जयते समृध्द गाव योजनेतील 29 गावांचा सन्मान
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goreesakal

दहिवडी (सातारा) : लोकसहभागातून सर्वात जास्त यशस्वी ठरलेली चळवळ म्हणून पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेचा (Water Foundation Water Cup competition) उल्लेख करावा लागेल. या चळवळीने सर्व राजकारण्यांना कामाला लावण्याचं काम केलं. कुणीही यापासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी केले. दहिवडीतील प्रांत कार्यालयासमोर पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृध्द गाव योजनेतील (Satyamev Jayate Samrudh Gaon Yojana) २९ गावांचा सन्मान तसेच हरित वसुंधरा माण-खटाव या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

Summary

पाण्याचं सर्वात जास्त महत्व हे माण तालुक्यातील जनतेला असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी रिचर्ड यांगथन, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्धन कासार, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र वडेवार, नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, नामदेव ननावरे, सुनिल पोळ, सिध्दार्थ गुंडगे, आबा लाड आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, पाण्याचं सर्वात जास्त महत्व हे माण तालुक्यातील जनतेला आहे. याच पाण्यासाठी साखळी सिमेंट बंधाऱ्यांचा जन्म झाला अन् नंतर जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shivar Yojana) सुरु झाली. पाणी फाउंडेशनमध्ये माणसाने सातत्याने उत्कृष्ट काम केले. यासोबतच हरित वसुंधरा या उपक्रमात अतिशय आदर्शवत काम प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी व त्यांचे सहकारी करत आहेत. एका पडीक, अस्वच्छ जागेचे सुशोभीकरण करुन त्यांनी सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

MLA Jaykumar Gore
'40 लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा'
Water Foundation Water Cup competition
Water Foundation Water Cup competition

प्रभाकर देशमुख म्हणाले, वाॅटर कप स्पर्धेत सर्वांत चांगलं काम माणमध्ये झाले. ही चळवळ ग्रामस्थांच्या कष्टामुळे यशस्वी झाली. समृध्द गाव स्पर्धेत सुध्दा सर्वात जास्त गावे माणमधील आहेत. हरित वसुंधराच्या माध्यमातून एक वेगळी वाट शोधली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे हे काम आहे. विनय गौडा म्हणाले, लोकचळवळ उभी राहिली तर कोणतंही काम यशस्वी होवू शकते याचं उत्तम उदाहरण हरित वसुंधरा आहे. यावेळी दहिवडीचे नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी हरित वसुंधरासाठी एक्कावन हजारांचा धनादेश दिला. डाॅ. प्रदीप पालवे, नामदेव ननावरे, ज्ञानेश काळे, बाळासाहेब कदम, किशोर इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश सूर्यवंशी व आबा लाड यांनी प्रास्ताविक केले. हणमंत जगदाळे यांनी सूत्रसंचालन, तर अजित पवार यांनी आभार मानले.

MLA Jaykumar Gore
पोलंडमधील धनुर्विद्येत भारताची जबरदस्त कामगिरी

हरित वसुंधरा माण-खटाव उपक्रमाचे कौतुक

प्रांत कार्यालयासमोरील साधारण सहा हेक्टर जमीन ही पडीक व अस्वच्छतेचं साम्राज्य असलेली होती. पण, या जागेचा कायापालट प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी अजित पवार, सुनिल पोळ, बलवंत पाटील, डाॅ. प्रदीप पालवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केला. या जागेला स्वच्छ करुन सपाटीकरण करण्यात आले. येथे वाॅकिंग ट्रॅक, वृक्षारोपण तसेच बसायला बाकडी ठेवण्यात आली. त्यामुळे एका सरकारी अधिकाऱ्याने ठरवले तर काय घडू शकते याचा प्रत्यय सर्वांना आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com