esakal | राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

विनोद तावडे यांनी सातारा शहरातील पक्षकार्याची माहिती घेतली. पक्ष संघटन वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर बुथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने पूर्ण करून बुथ कार्यकर्ता मजबूत करण्याचा सल्लाही दिला.

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे. मनुष्य दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. सांगली येथे जाण्यापुर्वी तावडे हे सातारा शहरात अल्पवेळ थांबले हाेते.

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या चर्चेत तावडे यांनी विविध प्रश्नांवर त्यांचे मत मांडले. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, हा दोष सरकारचा का ?

या प्रश्नावर तावडे म्हणाले, अशा प्रकरणात राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी. संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते राज्य सरकारने केले पाहिजे, असे सामान्य नागरिकांना वाटते. माणूस दोषी का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच.यावेळी सातारा जिल्हा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील,  आदी उपस्थित होते.

व्हा लाभार्थी! ३३ टक्के सवलत देऊनच सुरु झालीय FasTag ची अंमलबजावणी

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

गावक-यांनाे सावधान! मराठवाडी धरणातून आज सोडणार पाणी

दरजाईतील शेतकऱ्याचा खून; कारण अस्पष्ट

विष्णू श्री स्मृती बंगल्यात गांजासदृश वनस्पतीची लागवड; जर्मन युवकांना अटक