
Karad Bridge News Today : पुणे -बंगळुरू मार्गाचे मागच्या काही वर्षांपासून सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान पुण्यापासून ते बेळगावपर्यंत अनेकठिकाणी उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे मागच्या ४ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असल्याने यामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.
कोल्हापूर, सांगलीतून पुण्याला हजारो वाहने रोज ये -जा करत असतात. यामुळे कराड उड्डाणपूल कोल्हापूर -पुणे प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाचा विषय बनला आहे. अशातच कालपासून (ता.२४) एका मॅसेजने कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे असा प्रवास करणाऱ्याच्या गोंधळ घालत आहे. याबाबत नॅशनल हायवेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम माहिती दिली.