Lok Sabha Election : उदयनराजेंची बोगी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या इंजिनला जोडा; फडणवीसांचे मतदारांना आवाहन

जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गणले गेले आहेत. ते अनेक पक्ष, संघटनातून तयार झालेल्या महायुतीचे महानायक आहेत.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Sakal

पाटण : जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गणले गेले आहेत. ते अनेक पक्ष, संघटनातून तयार झालेल्या महायुतीचे महानायक आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी असून त्यांच्यासोबत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्यात कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही. विकासाच्या रेल्वेचे इंजिन मोदींचे आहे.

त्याला समाजातील सर्व घटकांचे वेगवेगळे डबे असुन सर्व जातीधर्माच्या लोकांना बसण्यासाठी त्या डब्यात जागा आहे. मात्र विरोधी इंडीया आघाडीकडे सर्व इंजिनच असुन त्यांच्याकडे सर्वसामान्यांना बसण्यास डबेच नाहीत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावासमोरील कमळाचे बटन दाबल्यावर सातारा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जोडली जावुन जिल्ह्याचा विकास सुरु होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासीत केले.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील बैल बाजार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री शंभुराज देसाई, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,

मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,

प्रदीप पाटील, भरत पाटील, भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता कचरे, नंदकुमार सुर्वे, अशोकराव पाटील, रामभाऊ लाहोटी, नाना सावंत, रामभाऊ डुबल आदी उपस्थित होते. इंडिया आघाडीचा समाचार घेत श्री. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांची २४ पक्षांच्या आघाडीची खिचडी आहे.

२४ इंजिन एकमेकांचे पाय ओढत असल्याने ही ट्रेन जागेची हालतही नाही आणि डुलतही नाही. खासदार उदयनराजेंच्या नावासमोरील कमळाचे बटन दाबल्यावर सातारा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकास चालू होईल.

नरेंद्र मोदींची विकासाभिमुख ट्रेन मित्र पक्षांचे डबे घेऊन सुसाट वेगाने धावत आहे. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी ८० टक्के गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरवले. विनातारण कर्ज मुद्रा योजनेतून देऊन ६१ कोटी सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक बनवले. १० कोटी महिला लखपती दीदी होणार आहेत.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांना भरघोस निधी मोदी सरकारने दिल्याने त्यांना चालना मिळाली असून शिवारे जलमय झाली आहेत. लोकसभा निवडणुक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे.

तंजावर पासून पेशावर पर्यंत स्वराज्याची पताका फडकविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. नरेंद्र मोदींनी अबकी बार चारसो पार असा नारा दिला असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा वारसदार बहुमताने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

  • लोकनेते बाळासाहेब देसाईंना पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

  • पाटण तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार

  • वसना-वंगणा, जिहे-कटापुर, टेंभु योजनेला कोट्यावधींचा निधी दिला.

  • २०२६ नंतर लोकसभा-विधानसभेत ३३ टक्के महिलांना संधी मिळणार

  • मोदी सरकारने कारखान्यांचा दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स रद्द केला

  • कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची उदयनराजेंनी केलेली मागणी पुर्ण करणार

  • पाटण तालुक्यात लोकसभेला मत कमळाला तर विधानसभेला मत बाणाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com