Wai Fire : वाईत जुन्या वाड्याला आग; आठवडा बाजारात दुर्घटना घडल्याने खळबळ

वाई येथील भाजी मंडईतील जुन्या वाड्याला दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
Old Wada Fire
Old Wada FireSakal

वाई - येथील भाजी मंडईतील जुन्या वाड्याला दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सोमवार आठवडा बाजार असल्याने मंडईत मोठी गर्दी होती. यावेळी लगतचे व्यवसायिक, भाजी व अन्य विक्रेते यांच्यासह नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पालिका व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दोन तासात आग आटोक्यात आली. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीत वाड्याच्या इमारतीचे व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

येथील गणपती आळीत भाजी मंडईत असलेल्या एका जुन्या वाड्यात पाठीमागे सकुंडे कुटुंबिय रहात असून दर्शनी बाजूस सय्यद ब्रदर्स सायकल मार्ट, हरिओम कलेक्शन व विजय किराणा ट्रेडिंग दुकाने आहेत. दुपारी सव्वा बारा वाजता सकुंडे यांच्या घराच्या माडीतून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी पालिका अग्निशामक दलाला व पोलिसांना कळविले.

दरम्यान काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आग आजू बाजूला पसरण्याची दाट शक्यता असल्याने रस्त्यावरील भाजी विक्रेते व लगतच्या दुकानदारांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलविला. त्यासाठी व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

दरम्यान वाई, पाचगणी, महाबळेश्वर पालिका तसेच किसन वीर कारखाना अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या व विघ्नेश सरकार, शेख वॉटर सप्लायचे टँकर यांच्या मदतीने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात आली. आजी - माजी नगरसेवक, व्यापारी व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

आमदार मकरंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com