esakal | भाविकांनाे! वाई पालिकेने अशी केलीय बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांनाे! वाई पालिकेने अशी केलीय बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था

ज्यांना घरी शक्‍य नाही, त्यांनी आपल्या गणेशमूर्ती पालिकेकडे दान करून सहकार्य करावे, अशी विनंती मुख्याधिकारी विद्या पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत आणि नगरसेवकांनी केली आहे.

भाविकांनाे! वाई पालिकेने अशी केलीय बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मूर्तींचे कृष्णा नदीपात्रात विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 
शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणपती विसर्जनासाठी गर्दी होऊ नये, म्हणून पालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना गेली अनेक वर्षे पालिका विविध संघटनांच्या माध्यमातून राबवत आहे. त्याच धर्तीवर यंदाही नदीपात्रात गणपती विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका काळजी घेत आहे.

आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स

विसर्जनासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यानुसार शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती संकलित करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व मूर्तींचे पालिकेच्या वतीने विधिवत व योग्य पावित्र्य राखून विसर्जन केले जाणार आहे. घरी शक्‍य असणाऱ्यांनी घरीच विसर्जन करावे व ज्यांना घरी शक्‍य नाही, त्यांनी आपल्या गणेशमूर्ती पालिकेकडे दान करून सहकार्य करावे, अशी विनंती मुख्याधिकारी विद्या पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत आणि नगरसेवकांनी केली आहे.

सरकार मायबाप! पंचनामा झाला, मग पैशाचं कधी?

कृष्णा नदीवर 'येथे' बांधला जाणार नवीन पूल; 13 कोटी मंजूर
 

गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या संकटाचाही सामना करायचा आहे. त्यादृष्टीने गणपती विसर्जनासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नागरिकांनी सहकार्य करत विसर्जनासाठी घाटावर जाऊ नये. संकलित केलेल्या सर्व मूर्तींचे पावित्र्य राखून विधिवत विसर्जन केले जाणार आहे. 

 - विद्या पोळ, मुख्याधिकारी

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top