Wai Election Results : वाईत पाटलांचाच वरचष्मा; गोरेंचे प्रयोग फसले, पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे कायम, तालुक्यात भाजपचीही ताकद वाढली

Zilla Parishad Seat-Wise Election Results : वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत आपली सत्ता व वर्चस्व कायम राखले.
Wai Election Results

Wai Election Results

esakal

Updated on

वाई : राष्ट्रवादी काँग्रेसने मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी यशवंतनगर, बावधन व ओझर्डे हे तीन गट जिंकून आपले निर्विवाद (Wai Election Results) वर्चस्व, तसेच पंचायत समितीतील आठ पैकी पाच गण जिंकून सत्ता कायम राखली. भाजपने भुईंज गटात आणि यशवंतनगर, बावधन व भुईंज गणात विजय मिळवून आपली ताकद वाढविली. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com