
वाई: सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दक्षिण काशी वाईत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात झाला. परंपरेनुसार गोविंदा आला रे आला असा जयघोष करत सिद्धनाथवाडी येथील सिद्धेश्वर गोविंदा पथकाने शहरातील अनेक दही हंड्या फोडल्या. यामुळे शहरातील वातावरण मंगलमय झाले होते.