
"New hopes, new faces: Karad’s political scene reshaped after ward reservation announcement."
Sakal
कऱ्हाड: नव्या प्रभाग रचनेच्या आरक्षणामुळे येथील राजकारणातील अनेक दिग्गजांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर भल्याभल्यांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. अनेकांना पर्याय खुले झाले असले, तरी काहींना पर्यायी प्रभाग शोधावे लागणार आहेत. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवख्यांची निवडणुकीला गर्दी असून, दिग्गजांवर प्रभाग शाेधण्याची वेळ आल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. आरक्षण सोडतीत काही इच्छुकांचा पत्ता कट तर काहींना नव्याने संधी मिळाली आहे. ३१ पैकी तब्बल १६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेत महिलाराज असेल.