क-हाड विटा रस्ता बंद; गजानन सोसायटीतील घरा घरांत पाणी

हेमंत पवार
Thursday, 15 October 2020

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. 

क-हाड : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे. क-हाड विटा रस्ता पाण्यामुळे वाहतुकीस बंद झाला.

क-हाड - विटा रस्त्यावर नेहमीप्रमाणे पाणी साठून आज (गुरुवार) रस्ता बंद झाला आहे. पाण्याचा अंदाज नसल्याने वाहनचालक गाडी चालवत पाण्यात शिरत आहेत. त्यामुळे  गाडी बंद पडली की ढकलत आणत आहेत. येथील गजानन हौसिंग सोसायटी आणि तेथील परिसरातील व्यवसायिकांनी काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार मोरया बंद केल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी वाट मिळेल त्या दिशेने मार्ग काढत घरामध्ये घुसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

पावसाचा साता-याला तडाखा! आटपाडी वाहतुक बंद, फलटण-पंढरपूर धिम्या गतीने

गजानन सोसायटीच्या परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे रहिवाशांना आपल्या घरात पाणी शिरू नये याकरता रात्री जागून काढावी लागली. अंगणात लावलेली वाहने रात्री आलेल्या पाण्यामुळे अर्धी बुडलेले आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने उपाययाेजना कराव्यात अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Logged On Karad Vita Road Satara News