कोरेगाव : प्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून (Dhom Dam) बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा- फलटणला पाणी सोडण्यात आल्याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदेशीरपणे पाणी विसर्ग होत असल्याचा निषेध करत हे पाणी त्वरित बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.