लईभारी! 16 दिवसांच्या आंदोलनाचं फलित; टॅंकरमुक्त 16 गावांचं स्वप्न पूर्णत्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tembhu Scheme

लईभारी! 16 दिवसांच्या आंदोलनाचं फलित; टॅंकरमुक्त 16 गावांचं स्वप्न पूर्णत्वास

दहिवडी (सातारा) : टेंभूचे पाणी (Tembhu Scheme) कोरेवाडी येथे आल्याने 2003 पासूनचे टॅंकरमुक्त 16 गावांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. 16 दिवसांच्या आंदोलनाचं हे फलित आहे. पण, पाण्याचा हा लढा अजून संपलेला नसून टेंभूचे पाणी (Water) जोपर्यंत शेतीला मिळत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. (Water Released From Tembhu Scheme At Korewadi Satara News)

कोरेवाडी (ता. माण) येथे आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बापूराव नलवडे, विरळीचे सरपंच प्रशांत गोरड, भारत अनुसे, तानाजी बनगर, बापूराव बनगर, काळचौंडीचे उपसरपंच आबा कोरे, बाबाराजे हुलगे, अनिकेत आटपाडकर, गणेश माने, हर्षद माने, किसन माने, किसन घुटूकडे, राजू गोरड, विष्णू जमाले, भागवत पिसे, शहाजी ढेरे, साहेबराव खरात आदी उपस्थित होते.

साताऱ्यात लसीचा तुटवडा; दुसरा डोस देण्यास विलंब झाल्याने नागरिक त्रस्त

देसाई म्हणाले, ""नेतृत्वाची द्यायची दानत असेल तर पाणी मिळतेच, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसून सर्वांनी साथ दिल्यामुळेच हे पाणी मिळाले आहे. ही पाण्याची योजना आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्‍यक आहे. जोपर्यंत राजकारणात आहे, तोपर्यंत कधीच ही योजना बंद पडू देणार नाही. आपला पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आपल्या शेतीसाठी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचे नाही.'' भारत अनुसे, बापूराव बनगर यांची भाषणे झाली. पोपट जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विरळीचे सरपंच प्रशांत गोरड यांनी आभार मानले.

'HRCT Test'साठी महिला-मुलांना 'माणदेशी' करणार आर्थिक मदत : प्रभात सिन्हा

Water Released From Tembhu Scheme At Korewadi Satara News

Web Title: Water Released From Tembhu Scheme At Korewadi Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top