
VIDEO पाहा : साताऱ्यात लसीचा तुटवडा; दुसरा डोस देण्यास विलंब झाल्याने नागरिक त्रस्त
सातारा : Covaxin Vaccine Scarcity In Satara : सध्या जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली चार हजार लस आज (बुधवार) 45 वयोगटापुढील नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र, अद्याप हा तुटवडा कमीच असल्याने नागरिकांना पुरेसे लसीकरण होताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. (Lack Of Covaxin Vaccine In Satara District)
दरम्यान, Covaxin लसीचा तुटवडा असल्याने आज कस्तुरबा रुग्णालयाच्या बाहेरील नागरिकांना पोलिसांनी covishield आहे, covaxin नाहीये असे सांगून ज्यांना covaxin लस हवी होती त्यांना घरी पाठविले. याबरोबरच सिव्हिल हाॅस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास खुर्ची नसल्याने काहींनी संताप व्यक्त केला. काही महिलांनी रांगेत न उभे राहणा-यांना लस दिली जात असल्याचा आरोप केला. लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली चार हजार लस आज (बुधवार) 45 वयोगटापुढील नागरिकांना देण्यात येत होती. ही वर्ग केलेली लस जिल्ह्यातील 11 सेंटरमध्ये उपलब्ध आहे.
माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी
देशभरात 45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास एक एप्रिलपासून सुरुवात झाली. यामध्ये सातारा जिल्ह्यात 9 लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी झाली होती. यातील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले, तसेच बहुतांशी नागरिकांचा पहिला डोस झाला होता. मात्र, जिल्ह्याला लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या दुसरा डोसला विलंब लागत होता.
दरम्यान, राज्यभरात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या वयोगटाची जिल्ह्यात सुमारे 11 लाख लोकसंख्या असून, त्यांच्या लसीकरणासाठी केवळ ऑनलाइन बुकिंग बंधनकारक करण्यात आले होते, तर दररोज 200 लशींचा कोटा उपलब्ध होता. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध होणारी बहुतांशी लस 18 ते 44 वयोगटासाठी दिली जात होती. 45 वर्षांपुढील नागरिक केवळ लशीच्या प्रतीक्षेतच राहात होते. दरम्यान, राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण तूर्तास थांबवून ही लस वयोवृद्ध नागरिकांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 45 वर्षांपुढील बहुतांश नागरिकांना दुसरा डोस मिळणे सोईस्कर झाले आहे.
Corona काळात कामगारांचा जीव धोक्यात; नरेंद्र पाटलांची राज्यपालांकडे धाव
जिल्ह्यातील 11 केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध झालेली चार हजार लस 45 वयोगटातील नागरिकांना मिळणार आहे. ही वर्ग केलेली लस जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, ग्रामीण रुग्णालय दहिवडी, ग्रामीण रुग्णालय मेढा, ग्रामीण रुग्णालय वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
Lack Of Covaxin Vaccine In Satara District
Web Title: Lack Of Covaxin Vaccine In Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..