esakal | सावधान! मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Morna Gureghar Dam

मोरणा गुरेघर धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणांमध्ये सध्या ८२.९७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

सावधान! मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : चार दिवसांतील पावसामुळे पाटण तालुक्यातील (Patan Taluka) मोरणा गुरेघर धरणातील (Morna Gureghar Dam) पाणी नियंत्रित करण्यासाठी ३६४.८७ क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या (Morna River) पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, कुणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे (Morna Gureghar Dam Project) सहायक अभियंता सागर खरात (Engineer Sagar Kharat) यांनी केले आहे. (Water Released Into The River From Morna Dam bam92)

मोरणा गुरेघर धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणांमध्ये सध्या ८२.९७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची पातळी ६५८.३०० मीटर आहे. पाटण तालुक्यातील मोरणा नदीवरती गुरेघर या ठिकाणी हे धरण आले असून, या मध्यम प्रकल्पामुळे विभागातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

हेही वाचा: 'सरकार चालवण्यासाठी मोदींनी कंपन्या, मालमत्ता, इमारती विकल्या'

धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आणि सुरू असलेल्या पावसामुळे छोटे- मोठे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था ठप्प होत असते; परंतु या वेळी या सर्व बाबींचा विचार करून पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोकूळ तर्फे पाटण येथील पूल हा सुरू राहणार आहे. गेट शेडुल्ड नियमानुसार पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ३६४.८७ क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, कुणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन सहायक अभियंता खरात यांनी केले आहे.

Water Released Into The River From Morna Dam bam92

loading image