साताऱ्यातील शाहूपुरी, शाहूनगरात पाण्याचा ठणठणाट; प्राधिकरणाकडून उडवाउडवीची उत्तरे

शाहूपुरीसह शाहूनगर परिसरात जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांमध्ये या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
Water Shortage
Water ShortageWater Shortage
Updated on

सातारा : नदीपात्रात पुरेसे पाणी असतानाही योग्य प्रमाणात उपसा होत नसल्यामुळे शाहूपुरीसह शाहूनगरच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. याबाबतच्या तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यपध्दतीत सुधारणा न झाल्याने या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शाहूपुरीसह शाहूनगर परिसरात जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांमध्ये या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टॅंकर व इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत आहे. याबाबत प्राधिकरणाकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी नदीपात्रात पुरेसे पाणी असले तरी उपसा करण्याच्या वेळापत्रकाचे स्थानिक पातळीवर पालन होत नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

नदीपात्रात पाणी असूनही शाहूपुरीच्या मोळाचा ओढा, आंबेदरे रोड, आझादनगरसह सुमारे 50 कॉलन्यांना तसेच गोडोली चौकापासून अजिंक्‍य बझार चौकापर्यंतच्या शाहूनगरमधील नागरिकांना गेले काही दिवस टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने नागरिकांच्या रोषास सामोरे जाण्यापेक्षा रजेवर जाणे चांगले, असा विचार करत प्राधिकरणातील काही अधिकारी रजेवर गेल्याची चर्चाही प्राधिकरण कार्यालयात सुरू आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर शाहूपुरी, शाहूनगरमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने तीव्र असंतोष असून, याविरोधात येत्या काही दिवसांत शाहूपुरीतील नागरिक प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

दरे खुर्दमध्ये ये रे माझ्या मागल्या...

हद्दवाढीनंतर दरे खुर्द हा भाग पालिकेत आला आहे. याठिकाणी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत होता. याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पुढाकार घेत त्याठिकाणी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा सुरू केला. यासाठी स्वतंत्र कर्मचारीही नेमण्यात आले. मात्र, अलीकडच्या काळात या भागाला पुन्हा आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com