
सोलापूर : उजनी धरण आता ९४ टक्के भरले असून धरणात सध्या ११४ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून भीमा नदीत सोडलेला विसर्ग १० हजाराने कमी करून तो आता पाच हजार क्युसेक एवढाच ठेवला आहे. दुसरीकडे कालव्यातून २१०० क्युसेकने पाणी सोडल्याने कॅनॉल सध्या तुडुंब भरून वाहत आहेत.