.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Koyana Dam Water Release
कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडून 6 हजार 827 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु करण्यात आला आहे. पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू आहे. धरणातून एकूण 7 हजार 877 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.