वांग नदीच्या पाणीपातळी होणार वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwadi Dam

मराठवाडी धरणात गेल्या पावसाळ्यात 1.4 टीएमसी पाणीसाठा झाला असून, लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

वांग नदीच्या पाणीपातळी होणार वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणातील (Marathwadi Dam) टेंभू योजनेसाठीचा (Tembhu Scheme) राखीव पाणीसाठा बुधवारपासून (ता. 2) सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे (Engineer Suren Hiray) यांच्या सूचनेनुसार जिहे-कटापूर प्रकल्प (Jihe-Katapur Project) उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए. सुतार (Engineer N. A. Sutar) यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. वांग नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Water Will Be Released From Marathwadi Dam Tomorrow For The Farmers Of Karad Patan Taluka)

मराठवाडी धरणात गेल्या पावसाळ्यात (Rainy Season) 1.4 टीएमसी पाणीसाठा झाला असून, लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना (Farmers) त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. टेंभू योजनेसाठीही या धरणातील ठराविक पाणीसाठा राखीव आहे. मराठवाडी धरणातून या हंगामात आतापर्यंत पाच आवर्तने पूर्ण झालेली असली तरी अजूनही जलाशयात मुबलक पाणीसाठा आहे. टेंभू योजनेचा राखीव पाणीसाठा सोडण्यासाठी बुधवारपासून सहावे आवर्तन सुरू होणार आहे.

हेही वाचा: रुग्णालय खासगी संस्थेला दिल्यास माझ्याशी गाठ; खासदार रणजितसिंहांचा रामराजेंना इशारा

सकाळी दहा वाजता पाणी सोडण्यास सुरवात होणार असून, पुढील अनेक दिवसांसाठी गेट उघडेच राहणार असल्याने नागरिकांनी वांग नदीपात्रात प्रवेश करून जीव धोक्‍यात घालू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. दरम्यान, टेंभूसाठी होणारा विसर्ग व तोंडावर आलेला पावसाळा यामुळे वांग नदीपात्रातील बंधारे प्लेटा काढून मोकळे करण्यात आले असून नदीपात्र त्यामुळे रिकामे पडल्याचे दिसून येत आहे.

Water Will Be Released From Marathwadi Dam Tomorrow For The Farmers Of Karad Patan Taluka

Web Title: Water Will Be Released From Marathwadi Dam Tomorrow For The Farmers Of Karad Patan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..