सातारा : पावसाचा जोर ओसरला; पाणीटंचाईची शक्‍यता

सातारा : पावसाचा जोर ओसरला; पाणीटंचाईची शक्‍यता
Updated on

सातारा : जुलै महिना निम्मा संपला तरी पावसाने जिल्ह्यात जोर धरलेला नाही. केवळ पिके जगविण्यापुरताच पाऊस होत आहे. ओढे, नाले अद्यापही कोरडेच आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 49.37 टक्के पाऊस झाला आहे. तर प्रमुख धरणांत एकूण 61.46 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 437. 49 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात 
 

जून महिन्याच्या सुरवातीला निसर्ग चक्रीवादळामुळे पाऊस झाला, पण त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामध्ये खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. वेळेत पेरण्या झाल्याने खरिपाची पिके चांगली आहेत. जुलैमध्ये तरणा पावसाचे नक्षत्र बऱ्यापैकी कोरडेच गेले आहे. आता म्हातारा पाऊस चांगला पडेल आणि विहिरी, ओढे, नाले दुथडी भरून वाहतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण, सध्यातरी तसे वातावरण नाही. हवामान विभागाकडून सातत्याने अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे. पण, सातारा जिल्ह्यात केवळ धरणांचे पाणलोट क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी तुरळकच पाऊस पडत आहे.
शहरातील नोकरदारांच्या बाबतीत रुजू होतोय नवीन ट्रेंड
 
जिल्ह्याची जून ते सप्टेंबरअखेर पावसाची सरासरी 886.20 मिलिमीटर आहे. जुलैपर्यंत 437.49 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यांची सरासरी 49.37 टक्के आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा आहे. सातारा 327.28, जावळी 567.24, पाटण 524.18, कऱ्हाड 259.54, कोरेगाव 288.22, खटाव 236.86, माण 176.29, फलटण 195.56, खंडाळा 165.10, वाई 314. 80, महाबळेश्‍वर 1816.68. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत सध्या एकूण 61.46 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या कोयना व उरमोडी धरण वगळता उर्वरित धरणांत 35 ते 45 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. 

प्रमुख धरणांतील आजचा (साेमवार) पाणीसाठा व कंसात गेल्यावर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा टीएमसीमध्ये असा आहे. कोयना 42.36 (44.40), धोम 4.66 (3.06), धोम-बलकवडी 1.82 (2.03), कण्हेर 3.95 (5.20), उरमोडी 6.04 (3.99), तारळी 2.62 (4.20). 
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत पडलेला पाऊस असा : कोयना 1635, धोम 274, धोम-बलकवडी 774, कण्हेर 355, उरमोडी 466, तारळी 451 मिलिमीटर.

आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि...

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com