esakal | सातारा-लोणंद मार्गावर गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून पाठलाग
sakal

बोलून बातमी शोधा

Wathar Station Police

गोमांस वाहतूक करणारी पिकअप गाडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पकडून वाठार पोलिसांच्या ताब्यात दिली.

सातारा-लोणंद मार्गावर गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By
राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : गोमांस वाहतूक करणारी पिकअप गाडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shivpratishthan Hindustan) कार्यकर्त्यांनी पकडून वाठार पोलिसांच्या ताब्यात दिली. सातारा-लोणंद (Satara-Lonand) मार्गावरील वाठार स्टेशनच्या (Wathar Station) वाग्देव चौकात ही घटना घडली. चालक व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (Wathar Station Police Arrested Two Persons At Pimpode Budruk Satara News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण पोलिसांना चकवा देत (क्र. एम एच 42,ए क्‍यू 2019) गाडी वाठारच्या दिशेने सुसाट निघाली होती. तिचा चालक महादेव शिवाजी कुंभार (वय 25, रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व साथीदार अक्षय बाळासाहेब कुंभार (वय 22, रा. आसू, ता. फलटण) यांच्यावर वाठार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून, दोन हजार पाचशे किलो गोमांस जप्त केले आहे.

मागील बाजूस भाजीची क्रेट लावून ही वाहतूक केली जात होती. ही गाडी वाठार स्टेशनमार्गे पुण्याकडे निघाली असल्याचे समजते. याबाबत शिवम चव्हाण (रा. वाठार स्टेशन) याने फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करत आहेत.

'असा निर्णय घेणारे माेदी हे जगातील एकमेव पंतप्रधान ठरले असतील'

Wathar Station Police Arrested Two Persons At Pimpode Budruk Satara News