esakal | शेतक-यांची काेटयवधींची फसवणुक; जालनाच्या कंपनीवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

farmers.jpg
शेतक-यांची काेटयवधींची फसवणुक; जालनाच्या कंपनीवर गुन्हा
sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई, खटाव व फलटण (Koregoan Satara Wai Khatav Phaltan) तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना (Framers) एक कोटी 34 लाख रुपयांचे निकृष्ट कांदा बियाण्याची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी संभाजी शिवाजी भोईटे (रा. नायगाव, ता. कोरेगाव) व मे. कलश सिडस प्रा. लि. जालना (Jalna) यांच्याविरुद्ध वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wathar Station Police Charged Two Jalna Satara Marathi News)

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात सातारा जिल्ह्यात अवकाळी, तसेच सततच्या पावसामुळे लागणीसाठी कांदा रोपे व बियाण्याचा तुटवडा भासू लागला होता. या वेळी शेतकऱ्यांनी तीन ते चार हजार रुपये किलो दराने बियाणे खरेदी केले. दरम्यान, संभाजी भोईटे याने जालना येथील कलश सिडस्‌ प्रा. लि. या कंपनीकडून विनापरवाना 1 कोटी 34 लाख 10 हजार रुपये किमतीचे 11 हजार 157 किलो कांदा बियाणे उपलब्ध करून येथील शेतकऱ्यांना या बियाण्याची विक्री केली. हे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवले गेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी या प्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात भोईटे व कलश सिडस्‌ यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.

""बियाणे खरेदी करत असताना शेतकऱ्यांना बियाण्याची पावती घेण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी आवाहन केले जाते. या प्रकरणात शेतकऱ्यांकडे पावती नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.''

- बापूसाहेब शेळके, तालुका कृषी अधिकारी

हेही वाचा: बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा