esakal | बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला

बोलून बातमी शोधा

Congress Logo
बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : युवक कॉंग्रेसने (Youth Congress) हेल्पलाइन केंद्र सुरू करून कोरोनाच्या (Coronavirus) काळात सामान्यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. प्रदेश युवक कॉंग्रेसने जिल्हानिहाय हेल्पलाइन (Covid 19 Helpline) सुरू केल्याने सामान्यांना फायदा होईल. कऱ्हाडच्या हेल्पलाइनचे काम नियोजनबद्ध सुरू असून, रुग्णांना मदतीचा हातभार लागणार आहे, असा विश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला. (Youth Congress Disclosed Helpline Numbers Covid 19 Satara Marathi News)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने हेल्पलाइनची मोहीम उघडली. त्याचे केंद्र कऱ्हाड शहरातही सुरू केले आहे. युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली येथे हेल्पलाइन केंद्र सुरू झाले आहे. आमदार चव्हाण यांनी पाहणी करून मार्गदर्शनही केले. युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजित चव्हाण, युवकचे अमित जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दुधेबावीची महालक्ष्मी यात्रा रद्द; पंचायतीच्या बैठकीत ग्रामस्थांचा महत्वपूर्ण निर्णय

आमदार चव्हाण म्हणाले,"" कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजला आहे. बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी धावाधाव करीत आहेत. अशा स्थितीत रुग्णांना मदत व्हावी, त्यांना वेळेत उपचार सुरू व्हावेत, यासाठी युवक कॉंग्रेसने देशभर हेल्पलाइन केंद्र सुरू केली आहेत. त्याच धर्तीवर प्रदेश युवक कॉंग्रेसनेही राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाइन केंद्र सुरू केली आहेत. जिल्ह्यासाठी कऱ्हाड येथे हेल्पलाइन सुरू झाले आहे. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हेल्पलाइन सेंटरचे काम नियोजनपूर्वक सुरू आहे.''

या वेळी उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले काेराेनाबाधितांच्या नातेवाईकांनी 7057432421

8830173907 , 7498545060 , 9168817535 , 9689364389 , 7775003442 ,

7020930998 या क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचण मांडावी. आम्ही ती साेडविण्याचा प्रयत्न करु.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: कोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन

Youth Congress Disclosed Helpline Numbers Covid 19 Satara Marathi News