
-राजेश सोळसकर
वडील लक्ष्मणराव पाटील यांचा विचार पुढे नेताना आजपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून अविरतपणे जनतेच्या प्रश्नांसाठी काम केले. त्याच्या परिणामस्वरूप कॅबिनेट मंत्री म्हणून आता राज्याच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झालं. आता यापुढील काळातही जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूच; पण याशिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची काहीशी विस्कटलेली घडीही पुन्हा बसवू, असा विश्वास मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. विस्थापितांचे प्रश्न, बेरोजगारी, मोठे प्रकल्प, शेतीचे पाणी यासारख्या जिल्ह्याच्या प्रश्नांवरही त्यांनी या मुलाखतीद्वारे जनतेला आश्वस्त केले.