Heavy Rainfall in Satara
esakal
सातारा : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात (Heavy Rainfall in Satara) काल दुपारपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्यानेही ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) दिला होता. त्यानुसार दुष्काळी फलटण, माण, खटाव तालुक्यांला अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील १३ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम अंतिम टप्प्यात असलेल्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणे रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत.