esakal | सातारा परिसरात गव्‍याचा वावर; वनविभागाकडून शोध मोहीम सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा परिसरात गव्‍याचा वावर; वनविभागाकडून शोध मोहीम सुरु

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : साताऱ्यातील (Satara) सदरबझार, तसेच खेड परिसरात रानगव्‍याचा वावर असल्‍याचे काल रात्री समोर आले. गवा आणि त्‍याच्‍यासोबत लहान पिल्‍लू फिरत असल्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर वन विभागाने (Forest Department) त्‍या परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे.

सदरबझार परिसरातील एका सोसायटीच्‍या मुख्‍य रस्‍त्‍यावर काल रात्री दहाच्‍या सुमारास रानगवा पिलासमवेत फिरत असल्‍याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यानंतर सोसायटीतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत करत रानगव्‍याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण नंतरच्‍या काळात समाजमाध्‍यमांवरून व्‍हायरल झाले. याची माहिती मिळाल्‍यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले.

हेही वाचा: डोंबिवलीत 'खड्डे लाईव्ह'; नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध

त्‍यांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत गव्‍याचा शोध घेण्‍याचे काम सुरू केले. याचदरम्‍यान खेड भागातही गवा फिरत असल्‍याची माहिती काही नागरीकांनी वन विभागाच्‍या अधिकाऱ्यांना दिली. यानुसार दुसरे पथक त्‍याठिकाणी पाठविण्‍यात आले. आज सकाळपासून गव्‍याचा शोध घेण्‍याची मोहीम वनविभागाने पुन्‍हा राबवली. मात्र, त्‍याचा कोणताही मागमूस लागला नव्‍हता. वन विभागाने नागरिकांना आवश्‍‍यक त्‍या खबरदारीच्‍या सूचना केल्‍या आहेत

loading image
go to top