esakal | म्हाते खुर्द : मित्राला वाचविताना मित्रच गाळात रूतला
sakal

बोलून बातमी शोधा

sanket Dalvi Mhate Khurd

आपल्या मित्राला वाचवितानाच संकेतचे पाय गाळात रुतल्याने तो बुडाला. एक तास त्याचा शोध सुरू होता. ग्रामस्थ व आदिवासी समाजातील कातकरी कुटुंबातील युवक यांच्या मदतीने एक तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर मेढा येथे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेत्यात आला.

म्हाते खुर्द : मित्राला वाचविताना मित्रच गाळात रूतला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (ता. जावळी ) : म्हाते खुर्द  येथील शेतकरी कुटुंबातील पट्टीचा पोहणारा युवक संकेत भैरवनाथ दळवी ( वय १९ ) हल्ली राहणार कोपरखैराणे हा आज सकाळी वेण्णानदीत पोहण्यास गेला होता. पोहताना  एका मित्राला दम लागला म्हणून त्यास मदत करण्यासाठी गेला असता स्वतःच गाळात रूतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

 कोरोना संसर्गामुळे मुंबई व नवी मुंबईकर बहुतांश कुटुंबे गावालाच आली आहेत.  त्यामुळे अनेक मित्र मंडळींचा मेळा गावोगावी एकत्र फिरताना गप्पा मारताना रानातला रानमेवा खाण्यासाठी जाताना, विहिरी व नदीत पोहताना दिसतात.

दोन दिवसापूर्वी जावळीत मोठा पाऊस झाला. त्यामुळे वेण्णा नदीला पाणी आल्याने पाणी वाहू लागले आहे. आज गढूळ पाणी निवळ झाल्याने संकेत आपल्या पाच मित्रांसह वेण्णानदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला. म्हाते खुर्द गावच्या हद्दीतील बेलाच्या डोहात सकाळी सात वाजता पोहण्यासाठी हे मित्र पोहोचले. सर्वजण पोहत होते. पोहताना एका मित्राला दम लागला. त्यामुळे पट्टीचा पोहणाऱ्या संकेतने त्याला  
रेटत बाहेर जाण्यास मदत केली.

मात्र आपल्या मित्राला वाचवितानाच संकेतचे पाय गाळात रुतल्याने तो बुडाला. एक तास त्याचा शोध सुरू होता. ग्रामस्थ व आदिवासी समाजातील कातकरी कुटुंबातील युवक यांच्या मदतीने एक तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर मेढा येथे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेत्यात आला.

 संकेतचे आई वडील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून संकेत हा आपल्या नातेवाईकांकडे कोपरखैराणे येथे शिक्षणासाठी राहत होता. वाशी येथे कॉमर्सच्या प्रथम वर्गात शिक्षण सुरू असून तो हुशार होता. धावणे व पोहणे यामध्ये तो पटाईत होता. त्यामुळेच यावर्षी तो भरतीमध्ये उतरणार असल्याचेही त्यांची मित्र सांगतात.

काळजात धस... 
 कोरानाच्या पार्शभूमीवर काही दिवसापूर्वी यांच गावांत घडलेला अर्णव दळवीचा मृत्यू व आज संकेत दळवीचा झालेला नदीत बुडून मृत्यू यामुळे म्हातेकरांच्या काळजातं धस झाले आहे.

loading image
go to top