tarli River Water and khambatki ghat landslide
sakal
सातारा - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे खंबाटकी, पसरणी घाटांमध्ये दरडी कोसळल्या असून, ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पावसाने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.