मायणी अभयारण्यासह 'सह्याद्री व्याघ्र' राखीव वनक्षेत्र; सात वनक्षेत्रांना वन्यजीव मंडळाची मान्यता

सचिन शिंदे
Saturday, 5 December 2020

साताऱ्यातील पक्षी अधिवासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मायणी वनक्षेत्रालाही (866 हेक्‍टर) दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रस्तावित केलेल्या सात संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये त्या परिसरातील राखीव वनक्षेत्रांचा समावेश आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्रचे मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्‍लेमेंट यांनी दिली.

कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा राज्य वन्यजीव मंडळाने कालच्या बैठकीत दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एकूण 86 हजार 554 हेक्‍टर वनक्षेत्राला दर्जा प्राप्त झाला आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील जोर-जांभळी, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, भुदरगड चंदगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्राचा समावेश आहे. 

कोल्हापूर वन विभागाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सात वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव दिला होता. कोल्हापूर वन विभागाने सातारा जिल्ह्यातील जोर- जांभळी (6,511 हेक्‍टर), कोल्हापूरमधील विशाळगड (9,324), पन्हाळा (7,291 ), गगनबावडा (10,548), आजरा-भुदरगड (24,663), चंदगड (22,523) व सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (5,692) येथील वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्रास दर्जा मिळाली. 

ग्रंथालयांना मिळणार 23.7 टक्के अनुदान; शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

त्यामुळे सह्याद्री व्याघ्रमधील एकूण 86 हजार 554 हेक्‍टर वनक्षेत्राला संरक्षणाचा दर्जा मिळाला आहे. साताऱ्यातील पक्षी अधिवासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मायणी वनक्षेत्रालाही (866 हेक्‍टर) तोच दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रस्तावित केलेल्या सात संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये त्या परिसरातील राखीव वनक्षेत्रांचा समावेश आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्रचे मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्‍लेमेंट यांनी दिली. 

कास ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावा; उदयनराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगांने या सातही वनक्षेत्रांना मिळालेले आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा वन्यजीव आणि खास करून व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सीमा विस्तारणार आहे. 
- रोहन भाटे, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wildlife Board Approves Seven Forest Areas Including Mayani Bird Sanctuary Satara News