Karad News : कोयना धरणावर जावुन पाणी सोडणार; माजी खासदार राजु शेट्टींचा इशारा

साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयना धरणातुन पाणी बंद करण्याचे दिले आदेश.
koyana dam water raju shetty

koyana dam water raju shetty

sakal

Updated on: 

कऱ्हाड - कोयना धरणातुन पाणी सोडण्यात न आल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षात सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील जनतेचा बळी जावु लागला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयना धरणातुन पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कोयना धरणातन पाणी सोडण्याचा निर्णय़ आज झाला नाही तर उद्या (गुरुवारी) सायंकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुतळे जाळुन निषेध नोंदवणार. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला घेवुन स्वतः कोयना धरणावर जावुन पाणी सोडणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com