

Ladki Bahin’ Impact Seen in Local Body Election Planning
Sakal
-स्वप्नील शिंदे
सातारा: राज्याच्या राजकारणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही सध्या सर्वात चर्चेची आणि प्रभावी ठरलेली योजना आहे. विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये या योजनेने महायुतीसाठी विजयाचे द्वार उघडले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता याच योजनेचा प्रभाव आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ग्रामीण भागातील सत्तेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेत दहा लाख ८५ हजार ८४७ लाडक्या बहिणी गेमचेंजर ठरणार आहेत.