विंगचा कानिफनाथ पायी दिंडी सोहळा रद्द; देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय

विलास खबाले
Friday, 13 November 2020

भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवसी विंग येथून दिंडी निघते. त्यानंतर एकादशीला ती पंढरपुरात पोचते. मोठ्या संख्येने विंगसह परिसरातून भाविक त्यामध्ये सहभागी होतात. सोहळ्याचे हे 21 वर्ष असून, कोरोनामुळे यंदा मात्र त्यात खंड पडणार आहे.

विंग (जि. सातारा) : कार्तिकी वारीनिमित्त प्रतिवर्षी पंढरपूरला जाणारा येथील कानिफनाथ पायीदिंडी सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. समिती सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या परवानगीने केवळ पादुका नेऊन देवदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. 

भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवसी येथून दिंडी निघते. त्यानंतर एकादशीला ती पंढरपुरात पोचते. मोठ्या संख्येने विंगसह परिसरातून भाविक त्यामध्ये सहभागी होतात. सोहळ्याचे हे 21 वर्ष असून, कोरोनामुळे यंदा मात्र त्यात खंड पडणार आहे. शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. मंदिरे बंदच आहेत. गावाला धार्मिक परंपराही मोठी आहे. पायीवारीच्या निमित्ताने ती जपली आहे. कोरोनामुळे यंदा मात्र व्यत्यय आला आहे. मोजक्‍याच भाविकांच्या साक्षीने केवळ "श्रीं'च्या पादुका पंढरपूरला नेऊन बाहेरूनच प्रदक्षिणा व देवदर्शन करण्याचे नियोजन असल्याचे दिंडीचालक नाना महाराज व अन्य सदस्यांनी सांगितले. 

Diwali Festival 2020 : लक्ष्मी आली नवा साज लेवून! केरसुण्यांना महिलांची पसंती

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wing Kanifnath Pai Dindi Ceremony Canceled Satara News