Patan Rain : मुसळधार पावसात शॉक लागून तांबवेत वायरमन जखमी

Wireman
Wireman esakal
Updated on

तांबवे (सातारा) : मुसळधार पावसाचा (Heavy Rain In Patan Taluka) जोर ओसल्याने तांबवे गावातील पुराचे पाणी कमी होवू लागले आहे. पुराच्या पाण्यात महावितरणची एक डीपी गेली होती. त्यामुळे अर्ध्या गावातील वीजपुरवठा (Power Supply) खंडित झाला होता. पाणी कमी झाल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गावातील वायरमन अमोल शिंदे आणि रवींद्र यादव गेले होते. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे रविंद्र यादव (Wireman Ravindra Yadav) यांना शॉक लागून ते जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये (Krishna Hospital Karad) दाखल करण्यात आले आहे. (Wireman Injured In Electric Shock In Tambave Patan bam92)

Wireman
..अखेर NDRF आंबेघरात पोहोचली

पावसाचे पाणी आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. ओढे-नाले भरुन वाहू लागले होते. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली. काल दुपारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठची गावे संपर्कहीन झाली होती. तांबवे गावच्या नवीन पुलावर पाणी आले आहे. गावच्या दक्षिणेकडील किरपे आणि डेळेवाडीच्या पुलावरही पाणी आले आहे. त्याचबरोबर तांबवे-साजूर मार्गावरही पाणी आले आहे.

Wireman
ढिगाऱ्यात दबलेल्या कोंढावळेकरांच्या मदतीला धावला 'देवमाणूस'

त्यामुळे गाव संपर्कहीन झाले होते. मात्र, पहाटेपासून पावासाचा जोर ओसरल्याने पूरस्थिती कमी होत आहे. त्यादरम्यान गावातील एक डीपी पाण्यात गेली होती. त्यामुळे अर्ध्या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पाणी कमी झाल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गावातील वायरमन शिंदे आणि यादव गेले होते. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे रविंद्र यादव यांना शॉक लागल्याने ते जखमी होवून डांबावरुन खाली कोसळले. त्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना तेथून उपचारासाठी डेळेवाडी मार्गे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गावात पहिल्यांदाच अशी दुर्घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Wireman Injured In Electric Shock In Tambave Patan bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety
Eknath Shinde Arrives at Dare Village
Marathi News Esakal
www.esakal.com