Satara News : घोणस चावल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू, गुढ्यात घरामागील गंजीतून वैरण काढताना घटना

घरात गेल्यावर त्या बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी प्रथम तळमावले येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. ग्रामस्थांनी घटनास्थळी शोध घेतल्यावर घोणसनेच त्यांना दंश केल्याचे स्पष्ट झाले.
Tragic end: Woman fatally bitten by a snake while collecting fodder behind her house in Gudiya village.
Tragic end: Woman fatally bitten by a snake while collecting fodder behind her house in Gudiya village.Sakal
Updated on

ढेबेवाडी : घराच्या पाठीमागील गंजीतून जनावरांसाठी वैरण काढत असताना घोणस सापाने दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुढे (ता. पाटण) येथे घडली. शशिकला रमेश पाटील (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com