esakal | कातरखटावात निराधार महिलेचा डोक्यात घाव घालून निघृण खून
sakal

बोलून बातमी शोधा

Katarkhatav crime news

येलमरवाडी येथे अज्ञातांकडून हिराबाई जगताप या निराधार महिलेचा डोक्यात घाव घालून खून केल्याची घटना घडलीय.

कातरखटावात निराधार महिलेचा डोक्यात घाव घालून निघृण खून

sakal_logo
By
धनंजय चिंचकर

कातरखटाव (सातारा) : येलमरवाडी (ता. खटाव) येथे अज्ञातांकडून 70 वर्षीय हिराबाई दगडू जगताप या निराधार महिलेचा डोक्यात घाव घालून खून केल्याची घटना घडलीय. या बाबत घटनास्थळावरुन व पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी, मयत हिराबाई जगताप (रा. एनकुळ, ता. खटाव) ही निराधार असून आपला भाऊ शामराव कांबळे व भाचा गौतम नलवडे यांच्या आश्रयाने ती आपल्या माहेरी येलमरवाडी येथे एकटीच राहत होती.

ती गावामध्ये घरोघरी भाकरी मागून उदरनिर्वाह करीत होती. रविवार १२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील एक युवक लघुशंकेसाठी गेला असता, त्यास मृतदेह दिसून आला. मयत हिराबाई जगताप यांचा मृतदेह बाळकृष्ण पांडुरंग पोळ यांच्या घराशेजारी सापडला. त्यांच्या डोक्याला घाव घातलेल्या मोठ्या जखमा दिसून येत होत्या. सदर माहिती येलमरवाडी येथील पोलीस पाटील प्रशांत बागल यांना देण्यात आली. बागल यांनी सदरच्या घटनेची माहिती तातडीने वडूज पोलिसांना दिली.

हेही वाचा: पश्चिम बंगाल : बंदुकीचा धाक दाखवत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर खून कोणी केला? का केला? कशासाठी केला? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मयताचा भाचा गौतम नलवडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध फिर्याद नोंदवून तक्रार दिली आहे. याचा तपास वडूज पोलिस स्टेशनच्या (Vaduj Police Station) पोलिस निरीक्षक एस. ए. पालेकर या करीत आहेत.

loading image
go to top