esakal | खटाव तालुक्यात ट्रॅक्टर खाली सापडून दरजाईतल्या महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

दरजाई येथे शनिवारी रात्री महिलेच्या पोटावरुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

खटाव तालुक्यात ट्रॅक्टर खाली सापडून दरजाईतल्या महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
सलीम आत्तार

पुसेगाव (सातारा) : दरजाई (ता. खटाव) येथे शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास महिलेच्या (Woman) पोटावरुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे (Tractor Accident) चाक गेल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. सुमन ऊर्फ कलावती महिपती पाटोळे (वय 50) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. (Woman Dies In Tractor Accident At Darjai Satara Crime News)

पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, शनिवारी (ता. 22) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दरजाई (ता. खटाव) येथे महिपती मारुती पाटोळे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यासमोर निढळ येथील श्रीकांत पवार यांच्या मालकीचा विनानंबरचा ट्रॅक्टर मुरुम टाकण्यासाठी आला होता. ट्रॅक्टरचा चालक (नाव व गाव माहित नाही.) वेगाने व निष्काळजीपणे ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीचे चाक सुमन पाटोळे यांच्या पोटावरुन जाऊन त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृ्त्यू झाला, अशी फिर्याद प्रकाश मधुकर पाटोळे (वय 48) रा. दरजाई यांनी दिली आहे. ट्रॅक्टर चालक भीतीमुळे पळून गेला आहे. हवालदार एस. एस. भोसले अधिक तपास करत आहेत.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लागोपाठ पाचव्या दिवशी 30 पेक्षा अधिक मृत्यू

Woman Dies In Tractor Accident At Darjai Satara Crime News