

The spot in Karad where a woman lost her life after being run over by a truck following a two-wheeler collision.
Sakal
मलकापूर : ट्रकने दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाली. येथील कोल्हापूर नाक्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील ट्रक घेऊन चालक पसार होत असताना पाठलाग करून गोटेच्या हद्दीत चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. नंदा रामचंद्र पवार (रा. दिवटे गल्ली, कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.