
भुईंज : राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावानजीक पुणेकडून सातारा दिशेने येताना दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने जागीच ठार झाली. तर पती गंभीर जखमी झाला. दुर्गा विजय जाधव (रा. उपळी, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे, तर विजय महादेव जाधव हे जखमी आहेत. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.