

रहिमतपूर : येथे उसाच्या कांड्या वेचत असताना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने आज महिलेचा मृत्यू झाला. याबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी कांताबाई म्हाळू सूर्यवंशी (वय ६५, रा. रोकडेश्वरगल्ली, रहिमतपूर) या शिवारात उसाच्या कांड्या वेचायचे काम करत होत्या.