Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Husband critically injured in Karad road Accident: महामार्गावर कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी
Fatal Crash in Karad Taluka: Woman Loses Life, Husband Battles for Survival

Fatal Crash in Karad Taluka: Woman Loses Life, Husband Battles for Survival

Sakal

Updated on

नागाव : अनोळखी कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार झाली. श्वेता अक्षय चव्हाण (रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे तिचे नाव आहे, तर तिचा पती अक्षय अधिकराव चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकलला धडक देऊन कंटेनर चालकाने तेथून पलायन केले. सर्वाधिक रहदारीची वेळ आणि महामार्गाच्या सहापदरी करणाचे काम यामुळे अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प राहिली. परिणामी, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com